IND vs AUS: घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचं चॅलेंज, पण त्याआधीच भारताला धक्का, मॅचविनर खेळाडू संघाबाहेर
भारताला फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियासोबत चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही कसोटी मालिका ९ फेब्रुवारी २०२३ पासून भारतात होणार आहे. ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे आणि जर संघाने ती जिंकली तर तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचेल. या मालिकेसाठी भारताच्या सिनियर खेळाडू संघात पुन्हा परतणार आहेत. पण २०२२ मध्ये भारताच्या टॉप-५ फलंदाजांमध्ये सामील असलेल्या या फलंदाजाला महत्त्वाच्या असलेल्या या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघातून बाहेर पडला आहे.
संघाचा दमदार खेळाडू श्रेयस अय्यर पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे, तर दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याच्या खेळण्यावर शंका आहे. श्रेयसचे सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक इंजेक्शन्स घेतल्यानंतरही अय्यरला पाठीच्या खालच्या भागात कमरेत दुखत आहे. अशा परिस्थितीत त्याला किमान दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. एका सूत्राने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, ‘त्याची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याने तो पहिला कसोटी सामना खेळू शकणार नाही. त्याचवेळी दुसऱ्या कसोटीतही त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. श्रेयस संघाबाहेर पडल्यानंतर सूर्यकुमार यादवचा मार्ग मोकळा झाला असून तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करू शकतो.