हि कंपनी कर्मचाऱ्यांना देणार इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी 3 लाख रुपयांपर्यंत आर्थिक प्रोत्साहन
JSW समुहाने सोमवारी पुढील वर्षी 1 जानेवारीपासून संपूर्ण भारतात इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत आर्थिक प्रोत्साहन रक्कम देण्याचा उपक्रम जाहीर केला आहे. JSW उद्योग समूहाने “भारताच्या राष्ट्रीय निर्धारीत योगदान (NDCS) आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी (IEA) च्या शाश्वत विकास परिस्थिती (SDS) सह संरेखित ग्रीन उपक्रम JSW इलेक्ट्रिक वाहन (EV) चे अनावरण केले आहे. संपूर्ण भारतातील कर्मचाऱ्यांसाठी हे धोरण आखण्यात आले आहे,” असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.
मोठ्या भारतीय कॉर्पोरेट कंपनीचा हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. हे EV धोरण 1 जानेवारी 2022 पासून देशातील कर्मचार्यांसाठी अंमलात येईल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
आर्थिक प्रोत्साहनाव्यतिरिक्त, कर्मचाऱ्यांसाठी सर्व JSW कार्यालये आणि प्लांटच्या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी विनामूल्य समर्पित चार्जिंग स्टेशन आणि ग्रीन झोन (पार्किंग स्लॉट) प्रदान केले जातील, अशी माहिती त्यात देण्यात आली आहे.
JSW समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल म्हणाले, “ पंतप्रधानांनी ग्लासगो COP26 च्या बैठकीत 2070 पर्यंत निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जनापर्यंत पोहोचण्याचा भारत प्रयत्न करत असल्याची घोषणा केल्यापासून, JSW समूहाने नवीन EV धोरण हा एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ज्यामुळे ईव्हीचा अवलंब वाढतो. ग्रीन मोबिलिटीमध्ये भारताचा प्रवेश सक्षम करणे हे या मागील उद्दिष्ट आहे.”
पर्यावरण, ऑटोमेशन आणि प्रक्रियांमध्ये अनेक बदलांसह, प्रचलित कर्मचारी धोरणांचे समकालीन पद्धतींसह पुनरावलोकन करणे आणि सामंजस्य करणे अत्यावश्यक आहे. भारत हा वाहतूक क्षेत्र सध्या CO2 उत्सर्जित करणारा तिसरा सर्वात मोठा देश आहे.”
पारंपारिक IC इंजिन वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहने अधिक कार्यक्षम असल्याने, जानेवारी 2022 पासून लागू होणारे JSW EV धोरण, इतरांनी अनुसरण करण्यासाठी उद्योग क्षेत्रात एक बेंचमार्क सेट करेल.