अतिवृष्टी जाहीर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार !
सलील देशमुख यांची ग्वाही...
काटोल, प्रतिनीधी
काटोल नरखेड विधासनभा क्षेत्रात अतिवृष्टी व पुरामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी उपविभागीय अधिकारी काटोल यांच्याकडुन नुकसानची माहिती जावुन घेतली. या संदर्भात आपण शासन स्तराव सरसकट पंचनामे करुन अतिवृष्टी जाहीर करण्यासंदर्भात शासन स्तराव प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी सलील देशमुख या चर्चा दरम्यान उपविभागीय अधिकारी श्रीकांत उबंरकर, काटोलचे तहसिलदार अजय चरडे, नरखेड चे तहसीलदार डि बी जाधव, नरखेडचे खंड विकास अधिकारी निलेश वानखेडे, काटोलचे खंड विकास अधिकारी संजय पाटील, काटोल नगरपरिषदेचे मुख्याधीकारी धनंजय बोरीकर, नरखेड बाजार समीतीचे सभापती सुरेश आरघोडे, नरखेड पंचायत समीतीच्या सभापती निलीमा सतीश रेवतकर, काटोल पंचायत समीतीचे सभापती धम्मपाल खोब्रागडे, उपसभापती अनुराधा अनुप खराडे, बंडोपंत उमरकर, चंद्रशेखर कोल्हे, निळकंठराव ढोरे, जिल्हा परिषद सदस्य बालु जोध, दिशा मुलताईकर, प्रितम कौरे, नरखेड पंचायत समीतीचे सदस्य सुभाष पाटील, मयुर उमरकर, अरुणा मोवाडे, माया मुरोढोया, काटोल पंचायत समीतीचे सदस्य संजय डांगोरे, निशीकांत नागमोते, अरुण उईके, चंदा देव्हारे, राष्ट्रवादीचे गणेश चन्ने, मनिष केने, गणेश सावरकर प्रामुख्याने उपस्थीत होते.
पुरामुळे नदी नाल्याकाठील नरखेड तालुक्यातील २५४४ हेक्टर मधील तर काटोल तालुक्यातील ४५० हेक्टर मध्ये नुकसान झाल्याचा प्राथमीक अंदाज असुन तसा अहवाल सुध्दा जिल्हाधीकारी यांना देण्यात आल्याची माहीती यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी दिली. काटोल तालुक्यातील १४६ तर नरखेड तालुक्यातील ७६ घरांचे नुकसान झाले आहे. तसेच काटोल तालुक्यातील दोन तर नरखेड तालुक्यातील एक व्यक्ती पुरात वाहुन गेल्याची माहिती यावेही देण्यात आली. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे श्री केदार यांनी काटोल तालुक्यातील २२ लहान पुल तर नरखेड तालुक्यातील ७ असे एकुण २९ पुल क्षतीग्रस्त झाले असून त्या करीता १७ कोटीचा दुरुस्ती कार्यक्रम तयार करण्यात आल्याची माहिती दिली. सिंचन विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या काटोल व नरखेड तालुक्यातील १३ बंधाऱ्यांचे नुकसान झाले आहे.
दोन्ही पंचायत समीतीने ठराव घ्यावे
काटोल व नरखेड तालुक्यात पुरासोबत अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे सरसकट पंचनामे करण्याची विनंती यावेळी सलील देशमुख यांनी केली. यावर अधिकाऱ्यांनी ज्या शेतीचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरु असल्याचे यावेळी सांगीतले. मोठया प्रमाणात नुकसान असल्यामुळे काटोल पंचायत समीती तसेच नरखेड पंचायत समीतीने विशेष सभा बोलावुन सरसकट पंचानामे करण्यासाठी ठराव घेण्याची विनंती यावेळी सलील देशमुख यांनी दोन्ही सभापतींना यावेळी केली.