दारू घातकच; संशोधनातून आली धक्कादायक माहिती समोर
प्रत्येकाचं व्यसन करण्याचं किंवा दारु पिण्याची कारणं वेगळी असतात. कोण दुःखामधे पित, कोणी सुखात, कोणीतरी सहजच कधीतरी म्हणून. तर अनेकदा दारु पिण्याचे काही फायदे असतात म्हणून देखील दारु पितात बरं का…. पण अनेकांना वाटतं की थोडीशी म्हणजे अगदीच कधीतरी पिल्यास काहीच होणार नाही. त्यावेळी नेमकी किती दारु पिणं योग्य असा प्रश्न उपस्थित केला जातो. आणि त्याचं उत्तर सध्या एका संशोधनातून समोर आलं आहे.
यासंदर्भात अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एक अभ्यायात असं नमूद केलं आहे. डब्ल्यूएचओने ‘द लॅन्सेट पब्लिक हेल्थ’ला आपले निवेदन प्रसिद्ध केले आणि त्यात त्यांनी स्पष्ट केलंय की अल्कोहोलच्या बाबतीत कोणतीही सुरक्षित मर्यादा नाही. कोणत्याही प्रकारची आणि कितीही प्रमाणात दारु पिण्याचे गंभीर परिणाम होतात.
यासंदर्भात करण्यात आलेल्या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की दारु पिल्याने 7 प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढतो. यामुळे तोंडाचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, इसॉफॅगस कॅन्सर(Esophageal cancer), ब्रेस्ट कॅन्सर, कोलन कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या सांगण्यानुसार, दारु किती महाग आहे किंवा जागतिक आरोग्य संघटनेच्या सांगण्यानुसार, दारू किती महाग आहे आणि ती कोणत्या ब्रँडची आहे याने काही फरक पडत नाही. कोणत्याही स्वरूपात दारूचे सेवन हे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. अगदी कमी प्रमाणात काय, दारूचा अगदी एक थेंब देखील आरोग्याला हानी पोचवू शकतो. अल्कोहोलचे जितके जास्त सेवन केले जाईल तितका शरीरातील रोगांचा धोका वाढेल. अल्कोहोलची थोडीशी मात्रा देखील स्लो पॉयझन म्हणून कार्य करते. त्यामुळे निरोगी व्यक्तीला अनेक आजार होऊ शकते असं या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहेे.