सांगली : तासगाव परिसरात यंदा दर्जेदार द्राक्षांचा हंगाम, शेतकऱ्यांना मिळतोय ‘इतका’ दर
यंदा द्राक्षांचा दर्जा चांगला राहिला आहे, उत्पादनही वाढणार आहे. द्राक्षांचा दर्जा ही उत्तम असणार आहे.
सध्या अल्प प्रमाणात विक्रीसाठी द्राक्षे तयार झाली आहेत. सध्या चार किलोच्या पेटीला शेतकऱ्यांना दोनशे रुपयांचा दर मिळत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून द्राक्षाचा मुख्य हंगाम सुरू होईल. तासगाव तालुक्यात यंदा दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.
Super, SS, Anushka या जातीच्या चार किलोच्या पेटीला २००, तर सोनाक्का, माणिक चमन जातीच्या द्राक्षांना १६५ ते १७० रुपयांचा दर मिळत आहेत. हा शेतकऱ्यांना मिळणारा दर आहे.यावर्षी दक्षिण भारतातील अनेक व्यापारी तासगाव परिसरात येण्यास यानिमित्ताने सुरुवात झाली आहे.