गीतांजली श्री ने जिंकले बुकर पारितोषिक, हा पुरस्कार मिळवणारी पहिली हिंदी कादंबरीकार

भारतीय कादंबरी लेखक गीतांजली श्री यांनी लिहिलेली ‘रेत समाधी’ या कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळाले आहे. इतिहासात प्रथमच हिंदी कादंबरीकाराला हा पुरस्कार मिळाला आहे. या कादंबरीचे अमेरिकन डेझी रॉकवेल यांनी हिंदीतून इंग्रजीत अनुवादित केले आहे, ‘टॉम्ब ऑफ सॅन्ड’ असे या कादंबरीचे इंग्रजी नाव आहे
प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळवणारी ‘रेत समाधी’ हि कोणत्याही भारतीय भाषेतील पहिली कादंबरी ठरली आहे. गीतांजली यांनी गुरुवारी लंडनमधील एका समारंभात रॉकवेलसोबत £50,000 किमतीचा पुरस्कार स्विकारला. यापुरस्काराने श्री या पूर्णपणे भारावून गेल्या.

आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक हे युनायटेड किंगडम किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या अनुवादित काल्पनिक कथांना दिले जाते आणि इंग्रजी भाषेतील काल्पनिक कथांसाठी बुकर पारितोषिक सोबत दिले जाते.
मुळात हिंदीत लिहिलेल्या या कादंबरीला यावर्षीचा प्रसिद्ध पुरस्कार मिळणे हा भारतातील देशी साहित्य क्षेत्रासाठी महत्त्वाचा क्षण आहे. गीतांजली श्री यांची ही कादंबरी भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर एका वृद्ध महिलेच्या पतीच्या मृत्यूनंतरच्या कथेवर आधारित कथा आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील मैनपुरी शहरात जन्मलेल्या 64 वर्षीय गीतांजलिश्री यांनी 5 कादंबऱ्या आणि अनेक कथा संग्रह आतापर्यंत लिहिले आहेत. ‘टॉम्ब ऑफ सॅन्ड’ हे त्यांचे ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेले पहिले पुस्तक आहे. 2018 मध्ये ‘रेत समाधी’ हि कादंबरी हिंदीमध्ये प्रकाशित झाली होती. पतीच्या मृत्यूनंतर निराश झालेल्या आईच्या परिवर्तनीय प्रवासावर आधारित हि कादंबरी आहे. या आघातानंतर ती तिच्या मूळ ठिकाणी म्हणजे पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेते, जिथे तिला एका आघाताचा सामना करावा लागतो ज्याचे अद्याप निराकरण झाले नाही. हा धक्का फाळणीच्या दरम्यान पळून जाण्यात यशस्वी झालेल्या एका व्यक्तीच्या संबंधित असतो. या कादंबरीबद्दल बोलताना गीतांजली श्रींनी पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लिहिले आहे की, “तुम्हाला एक स्त्री आणि बॉर्डर मिळाली की, कथा पुन्हा तयार होते.” यासाठी हे पुरेसे आहे. स्त्री हि स्वतःमध्ये एक कथा असते.

Leave A Reply

Your email address will not be published.