महाराष्ट्रात सध्या लावणी फेम म्हटलं की गौतमी पाटील म्हणून ओळखली जाते. गौतमी तिच्या अश्लील नृत्यामुळे चर्चेत अली होती. त्यानंतर तिने केलेल्या नृत्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोशल मीडियामुळे आजकाल कोणीही रातोरात स्टार होतं.
गौतमीच्या डान्सवर महाराष्ट्रात टिका केली जाते मात्र सोशल मीडीयावर तिचा असंख्य चाहता वर्ग आहे न त्यात दिवसेंदिवस वाढ होतेय. गौतमीच्या नृत्याने तरुणांना चांगलीच भुरळ पाडली आहे. गौतमीचा नृत्य पाहण्याकरीता गावखेड्यांमध्ये रेटारेटी सुद्धा झाल्याचं समोर आलं होतं.
मात्र आता गावखेड्यांमधील गौतमी आपल्या सर्वांना एका वेगळया भूमिकेमध्ये दिसणार आहे. गौतमी एका नवीन वेब सिरीजच्या माध्यमातून समोर येणार आहे. माध्यमांशी बोलत असताना तिने या बद्दलचा खुलासा केला.
तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. मात्र डान्स करताना तिच्या हावभावांमुळे तिला ट्रोल केलं जात आहे. दरम्यान गौतमी कोणत्या सिरीजमध्ये आणि कोणत्या भूमिकेत काम करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.