स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद बावनकुळेंच्या विजयाने झाला – देवेंद्र फडणवीस
बावनकुळे यांचा विजय भविष्यातील विजयाची नांदी
नागपूर – अकोला – बुलढाणा – वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद मला आज बावनकुळेंच्या विजयाने झाला आहे. बावनकुळेंच्या विजय महाविकास आघाडीला चपराक आहे.”
महाराष्ट्रातली जनता ही भाजपसोबत आहे हे देखील स्पष्ट होतं, आणि भविष्यातदेखील आम्हाला आशीर्वाद मिळेल. चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय आमच्या भविष्यातील विजयाची नांदी आहे.
“मी विशेष आभार मानतो नितीन गडकरी यांचे, त्यांच्या नेतृत्त्वात आम्ही लढलो आणि आम्हांला विजय मिळाला. विजयाच्या मालिकेची सुरुवात यानिमित्ताने झाली आहे. महाविकास आघाडीची मतंही नागपूर आणि अकोल्यात आम्हांला मिळाली. ज्यांनी मतं दिली त्या सर्वांचे आभार मानतो”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.