नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध; शरद पवारांना पुरावे देणार – देवेंद्र फडणवीस

जे आतापर्यंत बाहेर आलं नाही, ते आता मी बाहेर काढणार - फडणवीस 

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा आरोप आज केला. या आरोपाला फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. फडणवीस बिना पुराव्याचा आरोप करत नाही. आजपर्यंत केलेला आरोप मागे घेतला नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत त्यांनी ड्रग्जबाबत बोलू नये, असा इशारा फडणवीसांनी मलिक यांना दिला.

आपल्या जावयाची चार्जशीट विक व्हावी आणि कोणत्याही परिस्थितीत एनसीबीने आपल्या जावयाला या ड्रग्स प्रकरणातून सुटण्यासाठी मदत करावी यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी काय संबंध आहेत? हे मी दिवाळीनंतर जाहीर करेन. तुम्हालाही पुरावे देईन आणि शरद पवार यांनाही पुरावे देणार आहे. ज्यावेळी मी पुरावे देईल. ते पुरावेच असे असतील की त्याची चौकशी करावीच लागेल, असंही फडणवीस म्हणाले.

यावेळी नीरज गुंडेंच्या मुद्द्यावरही फडणवीस यांनी उत्तर दिले. मलिकांनी मुख्यमंत्र्यांसोबत गुंडेंबाबत चर्चा केली पाहिजे. नीरज गुंडे आमचे संबंधित आहेत. शंभर टक्के आहेत. मी जेवढ्या वेळा नीरज गुंडेंच्या घरी गेलो त्यापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या घरी गेलेले आहेत. मी जेवढ्या वेळा मातोश्रीवर गेलो त्यापेक्षा अधिक वेळा गुंडे मातोश्रीवर गेले आहेत. कदाचित माझ्याआधीपासून त्यांचे मातोश्रीशी संबंध आहेत. वाझे पाळण्याची सवय तुम्हाला आहे. आम्हाला नाही. आम्हाला गरजही पडत नाही, असं त्यांनी सांगितलं.

माझी पत्नी सोशल फिल्डमध्ये काम करते. माझ्यावर हल्ला करत नाही म्हणून पत्नीवर हल्ला केला जात आहे. मर्यादेचं उल्लंघन करणार नाही. पण उत्तर नक्की देऊ. माझे गुंडेंशी संबंध आहे. त्याविरोधात आरोप काय त्याच्याशी एकही केस नाही. ते एनसीपीचे गुन्हे बाहेर काढतात. हिंमत असेल तर त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करा. आम्हाला मांडवली करावी लागत नाही. आम्ही चर्चा करतो. मलिकांसारखे लोकं मांडवली करतात. त्यांच्यासाठी पर्सनल प्रकरण म्हणून त्यांनी वानखेडेंना टार्गेट केलं आहे. त्यावर तेच उत्तर देतील असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मलिक यांच्याविरोधात क्रिमिनल डिफेमेशन करण्याचा विचार करणार असल्याचंही सांगितलं.

मलिकांवर यापूर्वीही आरोप झाले होते. त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हाचा रिपोर्ट पहा. न्यायाधीशांनी त्यांचा खोटेपणा उघड केला होता. तो त्यांचा इतिहास आहे. जे आतापर्यंत बाहेर आलं नाही, ते आता मी बाहेर काढणार आहे. मी काचेच्या घरात राहत नाही. मी ईंट का जवाब पत्थर से देतो, असंही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.