हडपसर ते उरुळीकांचन ट्रॅफिक साठी अविरत प्रयत्न सुरूच, पण यश मिळेना!
तुम्ही रोज हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान प्रवास करताय? रोजच्या ट्रॅफिक ने तुमचा पण जीव गुदमरतो ना? करणार काय? लोकप्रतिनिधी त्यांचं काम करतात, पण प्रशासन त्या गतीने हा दिसत नाही.
एक गोष्ट मान्य करायलाच पाहिजे ती म्हणजे या ट्रॅफिक मुक्ती वर रामबाण उपाय काढला तो खा डॉ अमोल कोल्हे यांनी! त्यांनी पुढील १०० वर्षांचा विचार करून हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड कॉरिडॉर झाला पाहिजे, अशी आग्रही संकल्पना मांडली व त्यादृष्टीने शर्थीचे प्रयत्न सुद्धा सुरू केले. आजतागायत २०१९ साली खासदार झाल्यापासून ते खूप वेळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटले व या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले! अनेक वेळा NHAI सोबत बैठका घेतल्या, वेळोवेळी पत्र व्यवहार केले, पण नारळ काही फुटेना! यासोबत त्यांनी पाठपुरावा केलेले नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव चाकण शिक्रापूर, शिरूर ते वाघोली हे एलिव्हेटेड कॉरिडॉर साठी निधी मंजूर होऊन त्याची निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाली, मात्र हडपसर ते उरुळी कांचन कडे सुद्धा त्याच जोमाने लक्ष वेधून ते काम अद्याप पूर्ण झाले नाही.
आज खा डॉ अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड कॉरिडॉर करण्याची जोरदार मागणी केली. बाकी विकास कामांना जशी मदत केली, तशी याकामी सुद्धा नितीन गडकरी मदत करतील, अशी अपेक्षा खा डॉ अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. आता खा डॉ अमोल कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण व प्रामाणिक प्रयत्नांना NHAI कडून कधी प्रतिसाद मिळतोय, हेही पाहणं महत्वाचं ठरेल!