नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना या प्रकरणी समन्स बजावले असून 8 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
ईडीच्या या कारवाईबाबत काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केला असून भाजप राजकीय विरोधकांना धमकवण्यासाठी राजकीय आकस व सूडभावना मनात धरून तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचे म्हटले आहे
नॅशनल हेराल्ड प्रकरणात भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांच्यावर गंभीर आरोप केले.यंग इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून ते चुकीच्या पद्धतीने विकत घेतले गेले आणि काँग्रेस नेत्यांनी 2,000 कोटी रुपयांची संपत्ती काढून घेतल्याचा आरोप त्यांनी केला.हा खटला २०१५ मध्ये बंद करण्यात आला होता, परंतु आता तो पुन्हा सुरू करण्यात आला आहे
सुब्रमण्यम स्वामी यांच्या तक्रारीवरून, ईडीने या प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या तरतुदींनुसार तपास सुरू केला होता, परंतु काँग्रेसने सर्व आरोप ठामपणे फेटाळले.काँग्रेसचे म्हणणे आहे की यंग इंडिया लिमिटेडची स्थापना नफा कमावण्यासाठी नसून धर्मादायतेसाठी करण्यात आली आहे. प्रदीर्घ तपासानंतर, 2015 मध्ये हे प्रकरण बंद करण्यात आले, परंतु नंतर नवीन तथ्यांच्या आधारे पुन्हा राजकीय दबाव आणि भीती निर्माण करण्याकरिता निवडणुकांच्या तोंडावर हे प्रकरण पुन्हा उघडण्यात आले.
कर प्राप्तिकर विभागाने गांधी कुटुंबावर 249 कोटींचा कर निश्चित केला होता 27 डिसेंबर 2017 रोजी, आयकर विभागाने फसव्या व्यवहारातून गांधी कुटुंबाला झालेल्या 414.40 कोटी रुपयांच्या नफ्यावर 249.15 कोटी रुपयांचा कर आकारला होता.विभागाच्या या आदेशाला यंग इंडियाने इन्कम टॅक्स अपील एजन्सीमध्ये आव्हान दिले होते. त्याची 31 मार्च 2022 रोजी निपटारा करण्यात आली.यामध्ये गांधी कुटुंबीय लाभाची रक्कम ३९५ कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांनी दिला.
या प्रकरणी ईडीने गेल्या महिन्यात माजी केंद्रीय मंत्री पवन बन्सल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनाही चौकशीसाठी बोलावले होते.यानंतर दोन्ही नेत्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर होऊन प्रश्नांची उत्तरे दिली. चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहारांसह अनेक बाबींवर त्याची चौकशी केली होती.तेव्हापासून सोनिया आणि राहुल गांधी यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
ईडीने समन्स पाठवल्याने काँग्रेस नेत्यांनी आक्रमक होऊन भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, “भाजप राजकीय विरोधकांना धमकवण्यासाठी कठपुतळ्यांप्रमाणे तपास यंत्रणांचा वापर करत आहे. ममता बॅनर्जी, फारुख अब्दुल्ला यांच्यासह सर्व विरोधी नेते केंद्रीय यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत.”
“आम्ही झुकणार नाही आम्ही आमची लढाई चालूच ठेऊ . सोनिया गांधी स्वतः ईडी कार्यालयात जातील आणि सर्व प्रश्नांची उत्तरे देतील,” असे ते म्हणाले.
सिंघवी म्हणाले, “ईडीने 2015 मध्ये केस बंद केली, परंतु सरकारला ते आवडले नाही आणि संबंधित ईडी अधिकार्यांना काढून टाकले. सरकारने नवीन अधिकारी आणले आणि इतर मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हे प्रकरण पुन्हा उघडले.”
यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रवक्ते सुरजेवाला गरजले कि मोदी सरकार सूडाच्या भावनेने आंधळे झाले आहे, “मोदी सरकार सूडाच्या भावनेने आंधळे झाले आहे. मनी लाँड्रिंगचा कोणताही पुरावा नाही. नॅशनल हेराल्ड प्रकरणात केवळ इक्विटी किंवा कर्जाचे रूपांतरण झाले आहे.”
ते म्हणाले, “आम्ही घाबरणार नाही आणि झुकणार नाही, आम्ही खंबीरपणे लढू. हा राजकीय लढा आहे. काही दिवसांपूर्वी समन्स पाठवण्यात आले होते. गरज पडल्यास सोनिया गांधी नक्कीच जातील आणि त्यासाठी काही वेळ मागितला जाईल. राहुल गांधी.”