भावनिक प्रसंग पाहून सांत्वन करण्यासाठी चक्क स्टेज वर आल्या आजी
उत्तम अभिनयाचे सोशल मीडियावर कौतुक, व्हिडीओ व्हायरल
अभिनयाची ताकद काय असते हे सध्याच्या टेक्निकल फिल्मी दुनियेत सध्या दुर्मिळ होत चाललेली गोष्ट आहे. अभिनय जर ताकदवान असेल तर प्रेक्षक राजाला खिळवून ठेवता येते हे आपण ऐकलं होतं. परंतु स्टेजवरील अभिनयातला जिवंतपणा कधी कधी रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतो.
नुकतीच अशीच घटना घडली आहे, रात्र दशावताराची या नाटकाच्या सादरीकरणा दरम्यान. नाटकातील एका भावनिक प्रसंगाने भावूक झालेली एक म्हातारी आजी राजा-राणीचे सांत्वन करण्यासाठी चक्क स्टेज वर गेली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो व्हिडीओ पाहिल्यांनंतर समोरच्या प्रेक्षक वर्गाला रडवण्याची आणि स्टेजवर जाऊन सांत्वन करावं वाटणं हे फक्त आणि फक्त अभिनयातूनच शक्य आहे.
हा प्रसंग पाहण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.