होमिओपॅथिक वैद्यकशास्त्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण

डॉ.फारुख मास्टर यांची केईएम हॉस्पिटल मुंबई येथे कॅन्सर तज्ञ (ओंकॉलॉजिस्ट) म्हणून निवड

१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीचे डॉ. सॅम्युएल हॅनिमन यांनी होमिओपॅथीचा शोध लावला. होमिओपॅथिक औषधे देताना रोग्याचे व्यक्तीमत्व, आवडी निवडी, सवयी आणि एकूण आरोग्य विचारात घेऊन उपचार केले जातात. होमिओपॅथीचे संस्थापक डॉ.सॅम्युअल हॅनिमन यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण जगभरात १० एप्रिल हा दिवस “होमिओपॅथी दिन” म्हणून साजरा केला जातो. जगातील ८५ देशांमध्ये ५० कोटी नागरिक होमिओपॅथीचा लाभ घेत आहेत व दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. होमिओपॅथी हि सिमिलिया सिमिलिबस क्यूरेंटर या नियमावर आधारित समचिकित्सा पद्धती आहे.

होमिओपॅथी क्षेत्रासाठी एक महत्वाची आणि उल्लेखनीय गोष्ट म्हणजे वरिष्ठ होमिओपॅथी तज्ञ डॉ.फारुख मास्टर यांची केईएम हॉस्पिटल मुंबई येथे कॅन्सर तज्ञ म्हणून निवड करण्यात आली आहे. कॅन्सर साठीच्या मुख्य उपचार पध्द्तींमध्ये होमिओपॅथीचे स्थान निर्माण करण्यामध्ये डॉ.मास्टर यांचा सिंहाचा वाटा आहे. केईएम सारख्या नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये आता कॅन्सरग्रस्तांसाठी होमिओपॅथी हि उपचार पद्धती देखील उपलब्ध असणार आहे. होमिओपॅथिक वैद्यकशास्त्राच्या इतिहासातील हा एक सुवर्णक्षण म्हणावा लागेल. डॉ.फारुख मास्टर यांची केईएम हॉस्पिटल मुंबई येथे कॅन्सर तज्ञ (ओंकॉलॉजिस्ट) म्हणून निवड करण्यात आली आहे.

डॉ.फारूख मास्टर हे जगातील १० प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टरांपैकी एक आहेत. ते भारतातील पहिले एमडी होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. त्यांनी कॅन्सर मध्ये पीएचडी केलेली आहे. ४२ वर्षांच्या प्रदीर्घ होमिओपॅथिक प्रॅक्टिस मध्ये त्यांनी होमिओपॅथिक औषधांनी हजारो गंभीर रुग्णांना जीवनदान दिले आहे. ते होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. आत्तापर्यंत त्यांची ५५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

ते पहिले भारतीय आहेत ज्यांना हाऊस ऑफ लॉर्ड युनाटेड किंग्डम ने सन्मानित केले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी स्वतःचे होमिओपॅथिक स्कुल युरोप व यूएसए मध्ये सुरू केले आहे. त्यांच्या होमिओपॅथी व कॅन्सर वरील योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अनेक अॅलोपॅथिक हॉस्पिटल्समध्ये होमिओपॅथिक बाह्य-रुग्ण विभाग सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. यामध्ये बॉम्बे हॉस्पिटल, किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल, नौरोसजी वाडिया हॉस्पिटल, जेरबाई वाडिया हॉस्पिटल आणि कमलनयन बजाज कॅन्सर सेंटर – रुबी हॉल क्लिनिक, पुणे या प्रमुख हॉस्पिटल्सचा समावेश आहे.

खाजगी आणि सरकारी क्षेत्रात मुख्य प्रवाहातील उपचारांचा एक भाग म्हणून होमिओपॅथीची ओळख करून देणारे डॉ मास्टर हे पहिले व्यक्ती आहेत. ते पहिले होमिओपॅथिक डॉक्टर आहेत ज्यांनी होमिओपॅथीची ओळख ऍलोपॅथिक अद्ययावत हॉस्पिटल व खाजगी हॉस्पिटलमध्ये मुख्य उपचार पद्धती म्हणून निर्माण केली. मुंबई व मुंबईच्या परिसरातील अॅलोपॅथी हॉस्पिटल्समध्ये होमिओपॅथिक विभाग सुरू केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.