डाॅ.भालेकर दाम्पत्यानं एका पाच वर्षांच्या मुलाचं जीवन केलं प्रकाशमय!
डाॅ.भालेकर दाम्पत्यानं एका पाच वर्षांच्या मुलाचं जीवन केलं प्रकाशमय!
शिरूर शहरात एक अद्यावत डोळ्यांचे व्हिजन केअर सेंटर उभारून गरजू रुग्णांना मोठा दिलासा देण्याचं काम डाॅ.भालेकर दाम्पत्य करत आहेत. नुकतच त्यांनी एका पाच वर्षांच्या लहान मुलाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करुन त्याला दृष्टी मिळवून दिली आहे. तो मुलगा लहानपणापासूनच अंध होता. त्याच्या जीवनात नुसता अंधार होता. पण डाॅ.दामत्यानं त्याच्या जीवनातला अंधार दूर करुन त्याला एक नवसंजीवनी दिली आहे.
सृष्टी पाहण्यासाठी दृष्टी लागते. पण निसर्गानच ती काहींची हिरावून घेतली असेल तर काही अंशी विज्ञानानं त्याच्यावर यश मिळविलं आहे. डोळा हा सगळ्यात नाजुक अवयव आहे. डोळ्यांच्या अवघडातल्या अवघड शस्त्रक्रिया डाॅ.भालेकर दाम्पत्यानं यशस्वी करुन दाखविल्या आहेत. एका लहान मुलाला दृष्टी मिळवून दिल्यामुळे आणि माणूसकीचं दर्शन घडविल्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शिरूर चे आमदार अशोक पवार, पुणे जि.प.सदस्या, सुजाता पवार, शिरूर ता.रा.काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, रवीबापू काळे, पंचायत समितीच्या सभापती, मोनिका हरगुडे, बिजवंत शिंदे आदिंनी त्यांच्या या कामाचं कौतुक केलं आहे.