सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार
स्वतः हि निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले...
मंचर. दि. १९. ०८. २०२४
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रेचे आंबेगाव-शिरूर मतदारसंघात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव-शिरूर यांच्या वतीने दिलीपराव वळसे पाटील यांच्या नेतृत्वात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या शेतकरी मेळाव्याला आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राज्याचे उपमुख्यामंत्री अजित पवार यांना महिलांच्याकडून राखी बांधण्यात आली.
या मेळाव्यात जनसमुदायाला संबोधित करत असताना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे भरभरून कौतुक केले. यावेळी बोलत असताना त्यांनी दिलीपरावांसारखे नेतृत्व आंबेगावकरांना लाभले, हे तुमचे नशीबच असा आवर्जून उल्लेख केला. राज्यातील सर्वाधिक एक नंबरचे मताधिक्य आगामी विधानसभा निवडणुकीत आपण वळसे पाटलांना देण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील जनतेला मार्गदर्शन केले. यावेळी बोलत असताना त्यांनी मागील ३५ केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला व जनतेने मागील ३५ वर्ष जी साथ दिली त्याबद्दल जनतेचे आभार मानले. तालुक्यात सुरु असलेल्या विविध विकासकामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. शिरूर तालुक्यातील बारा गावांना पाणी पुरवठा करण्यासंदर्भात आपला प्रयत्न सुरु असून, दोन्ही उपमुख्यमंत्रांच्या साथीने हा प्रश्न लवकरच मार्गी लावू असा आवर्जून उल्लेख त्यांनी यावेळी केला. आगामी निवडणूक हि त्याच ताकदीने लढवण्याचा आणि जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच आगामी निवडणूक हि माझी मुलगी पूर्वा लढवणार नसून, आपण स्वतः हि निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.