आपल्या गरजा मर्यादीत ठेवा पण मुला मुलींना उत्तम दर्जाचे शिक्षण द्या :- दिलीप वळसे पाटील

पुणे | शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील दि. १२ मे रोजी काटाळवेढा गावचे माजी सरपंच बारकुशेठ भाईक यांचे नातू डॉ. राहुल व कवठे येमाई माजी सरपंच सुजाता साहेबराव कांदळकर यांची कन्या डॉ. काजल यांच्या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांनी वधू वरांस शुभाशिर्वाद देत उपस्थित जनसमुदयास संबोधित करताना म्हटले की, घर छोटे बांधा आपल्या आपल्या गरजा मर्यादित ठेवा पण आपल्या मुला मुलींना उत्तम शिक्षण द्या. पुढे ते म्हणाले की पूर्वी डॉक्टरच्या घरात डॉक्टर, इंजिनिअरच्या घरात इंजिनियर उद्योगपतींच्या घरात उद्योगपती जन्माला येत होते. परंतु शिक्षणाचे क्षेत्र विस्तारल्यामुळे सामान्य घरातील मुले मुली इंजिनिअर, डॉक्टर होऊ लागले आहेत. मुलींनीही अनेक क्षेत्रात प्रगती केलेली आहे.

या परिवारातील नववधू डॉ. काजल आणि वर डॉ. राहुल हे उच्चशिक्षित असूनअतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. या शुभ प्रसंगी नव दाम्पत्याने मंगरूळ (पारगाव) येथील अनाथलयातील सर्व बालकांची भविष्यात कायमस्वरूपी मोफत वैद्यकीय उपचाराची जबाबदारी स्वीकारत एक आदर्शवत संकल्प केला.
या लग्न सोहळ्यास दिलीपराव वळसे पाटील यांच्या सह आमदार निलेश लंके, माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रकाश पवार, पारनेर मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रशांत गायकवाड ,जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तथा संचालक धोंडिभाऊ पिंगट, शिरूर मार्केट कमिटी संचालक राजेंद्र गावडे, पारनेरचे नगराध्यक्ष विजुभाऊ औटी , राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष व नगरसेवक डॉ. बाळासाहेब कावरे , अहमदनगर शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष श्री रावसाहेब रोहकले सर , शिरूरच्या माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे, विघ्नहर साखर कारखाना संचालक शंकरदादा साळवे , प्रा.गीताराम गायकवाड (पुणे ) , पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, अरुणाताई घोडे , सुदाम इचके, पारनेर मार्केट कमिटी माजी संचालक खंडू भाईक, चेअरमन चंद्रकांत साबळे , काटाळवेढा सरपंच पियुष गाजरे , निमगाव सावा सरपंच किशोर घोडे, सामाजिक कार्यकर्ते शहाजी पवार , संजय भाईक, संभाजी साबळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.लहू साबळे यांनी तर आभार श्री. बाजीराव भाईक यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.