देहू नगरपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता, आ.सुनील शेळकेंची जादू कायम
देहू नगरपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता, आ.सुनील शेळकेंची जादू कायम
देहू नगर पंचायतीच्या च्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत एकहाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत आ.सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवली होती. यामध्ये एकूण 17 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले असून दोन जागांवर अपक्षांची लॉटरी लागली आहे. तर, काँग्रेस आणि शिवसेनेला खातं देखील उघडता आलं नाही. भाजपचे नेते माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलेल्या भाजपला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत संजय उर्फ बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यात सुनील शेळके यांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
देहू ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर प्रथमच निवडणूक पार पडली. यात, मोठ्या फरकाने राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. नगरपंचायत निवडणुकांमध्ये प्रचारादरम्यान माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळाली होती यामध्ये दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती
मात्र, निकालानंतर भेगडे यांच्या पदरी निराशा पडली आहे. एकूण 16 जागांसाठी 60 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी, 14 राष्ट्रवादी, 1 भाजपा आणि 2 अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. तर, काँग्रेस आणि शिवसेनेला खातं देखील उघडता आलं नाही.