उद्या सोमेश्वर मंदिरात होणार स्वच्छता अभियान; पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनाला माजी नगरसेवक सनी निम्हण याचा प्रतिसाद

पुणे : २२ जानेवारी २०२४ हा दिवस संपूर्ण भारतासाठी अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. अयोध्या धाम येथे प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. संपूर्ण देशात आतापासूनच उत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी या पार्श्वभूमीवर देशातील सर्व मंदिरांची साफसफाई करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनास मान देऊन; श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान, सोमेश्वरवाडी, पाषाण, पुणे येथे २१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ६.३० वाजेपासून मंदिर स्वच्छता केली जाणार आहे.

मा. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सोमेश्वर फाउंडेशन च्या माध्यामतून मंदिर परिसर स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या मंदिर स्वच्छता अभियानास सर्व सोमेश्वर भक्तांनी व ग्रामस्थांनी आवर्जून उपस्थित व्हावे, असे आवाहन माजी नगरसेवक सनी दादा निम्हण यांनी केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.