छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधींचे विचार रयतेच्या कल्याणाचे: सत्यजीत तांबे

प्रतिनिधी, जळगाव

छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वराज्याच्या ध्येयामध्ये रयतेच्या कल्याणाचा समान धागा होता. त्यांचे विचार शेतकरी, गोरगरीब आणि सर्वधर्मसमभाव यांच्या कल्याणासाठी होते. आजच्या तरुणांनी या विचारांमधून प्रेरणा घेऊन आपापल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करावे, असे प्रतिपादन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.

जैन हिल्स येथील गांधीतीर्थ येथे जयहिंद लोकचळवळ व गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचव्या जयहिंद ग्लोबल कॉन्फरन्सच्या समारोप समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमात इंडोनेशियाचे गांधीवादी विचारवंत इंद्रा उदयन, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सचिन इटकर, संकेत मुनोत, गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन, डॉ. आश्विन झाला, डॉ. रवींद्र वानखेडे, दुर्गा तांबे, शैलेंद्र खडके आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. सुधीर तांबे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ३०० युवक-युवती, तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, बुलढाणा, अहमदनगर, औरंगाबाद येथील संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.