शिवसेना भवनसमोर कारला भीषण आग; परिसरात खळबळ
दादरमध्ये शिवसेना भवनसमोर एका कारला भीषण आग लागली आहे, त्यामुळे एका बाजूची वाहतुक थांबवण्यात आली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे.
या कराला मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिकांनीही प्रयत्न केले. ही आग शिवसेना भवनसमोरच लागली असल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. ही कार पूर्णपणे आगीत भस्मसात झाली आहे.
या आगीमुळे या रस्त्यावरुन वाहतुक थांबवण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणणी आहे. वॅगनार ही कार शिवसेना भवनसमोर थांबवण्यात आली होती, या कारला अचानक भीषण आग लागली.
अचानक लागलेल्या आगीमुले परिसरात खळबळ उडाली. शिवसेना भवनमध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची शिवसेना नेत्यांसोबत बैठक सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेना भवन समोरच एका कारला भीषण आग लागली आहे.