जुन्नर तालुक्यातील कौशल तांबेची १९ वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड

शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा - आ.अतुल बेनके

जुन्नर | जुन्नर तालुक्यातील ओतूर गावचा सुपुत्र युवा क्रिकेटपटू कौशल सुनील तांबे याची १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. कौशलच्या या निवडीमुळे ओतूर ग्रामस्थांनी कौशलचे कौतुक केले आहे. कौशलच्या या निवडीमुळे जुन्नर तालुक्याची मान निश्चितच अभिमानाने उंचावली आहे असे गौरवोद्गार आ.अतुल बेनके यांनी त्याचे कौतुक करताना काढले आहेत. याविषयीची पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुक सोशल मीडिया पेजवरून शेअर केली आहे.

शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! अभिनंदन 

जुन्नर तालुक्यातील ओतूर गावचा सुपुत्र युवा क्रिकेटपटू कौशल सुनील तांबे याची १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. कौशलच्या या निवडीमुळे तमाम जुन्नरकरांची मान निश्चितच अभिमानाने उंचावली आहे. 

– आ.अतुल बेनके

क्रिकेट या खेळामध्ये आत्ताच्या काळात जोरदार स्पर्धा आहे, त्यामुळे खेळातील सातत्य व मैदानावरील कामगिरी याच्या जोरावर क्रिकेटमधील भवितव्य अवलंबून असते. कौशलचे वडील ACP सुनील तांबे हे पोलिस दलात कार्यरत होते.

कौशलची कोलकाता येथे होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी १९ वर्षाखालील भारतीय संघात निवड झाली आहे. कौशल हा एस.पी. कॉलेजचा विद्यार्थी आहे. गेली ७ वर्ष महाराष्ट्र राज्य संघाचे तो प्रतिनिधित्व करत आहे. तो १६ वर्षाखालील गटात २०१७ मध्ये पश्चिम विभागाचा कर्णधार होता. त्याने २०१६ मध्ये १६ वर्षा खालील विजय हजारे ट्रॉफी मध्ये सौराष्ट्र विरुद्ध त्रिशतक आणि गुजरात विरुद्ध द्विशतक झळकावले आहे. अलीकडेच विनू मंकड ट्रॉफीमध्ये दोन शतके आणि चॅलेंजर्स ट्रॉफी मध्ये भारत डी चे प्रतिनिधित्व करताना त्याने ९७ धावा केल्या होत्या. तो सध्या भारतामध्ये गोलंदाजीत दुसऱ्या आणि फलंदाजीत चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या १० वर्षापासून दहा वर्षापासून तो पुण्यातील कॅडन्स अकादमी कडून खेळत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) कडून २०१६ मध्ये उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार देखील मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.