महापालिकेच्या अर्थसंकल्पात मुंबईकरांना मोठा दिलासा; ठळक योजना आणि तरतुदी एका क्लिकवर…

मुंबई महापालिका २०२३-२४साठीचा अर्थसंकल्प आज शनिवारी आयुक्त आणि प्रशासक इकबासिंह चहल यांनी सादर केला. पालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत ७ मार्च रोजी संपल्याने ८ मार्चपासून प्रशासकाच्या हाती कारभार गेला आहे. त्यामुळे प्रशासक इकबालसिंह चहल यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. एप्रिल १९८४ मध्ये द. म. सुखटणकर यांची पहिले प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तर पुढे १२ नोव्हेंबर १९८४ ते ९ मे १९८५ या कालावधीत जे. जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर तब्बल ३८ वर्षानंतर इकबालसिंह चहल यांच्या प्रशासकीय राजवटीत अर्थसंकल्प मांडला आहे.

इकबासिंह चहल यांनी २०२३-२४ साठीचा ५२ हजार ६१९ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पाच्या निधीत १४. ५२ टक्क्यांनी वाढ झाली असून ती ६ हजार ६७० कोटींची रुपयांची वाढ आहे. अर्थसंकल्पातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त कर किंवा करात वाढ करण्यात आलेली नाही.

२०२२ – २३ मध्ये, बेस्ट उपक्रमास १३८२.२८ कोटी रु इतक्या आगाऊ रकमेचे, सदर रक्कम ही कर्ज म्हणून ग्राह्य धरण्याबाबत राज्य शासनाच्या निर्णयासापेक्ष रक्कम देण्यात आली आहे. या रकमेमध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपदानाचा खर्च भागविण्याकरीता २४८२.२८ कोटी, निवृत्त कर्मचाऱ्यांची विविध देणी भागविण्याकरीता ₹४५० कोटी आणि दैनंदिन प्रचलनाकरीता उपक्रमाने घेतलेले अल्प मुदतीचे कर्ज फेडण्याकरीता ₹४५० कोटी या रकमांचा समावेश आहे..

याशिवाय, सार्वजनिक वाहतूकीचे महत्व लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमास त्यांची प्रचालन व्यवस्था सुधारण्यासाठी सहाय्य म्हणून सन २०२३ २४ च्या अर्थसंकल्पामध्ये १८०० कोटी एवढी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.