पुण्यातील मोठ्या डेअरी समूहावर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात ४०० कोटींहून अधिक काळा पैसा उघडकीस!
पुण्यातील आघाडीच्या डेअरी समूहावर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात ४०० कोटींहून अधिक काळा पैसा उघडकीस आला आहे.
गुरूवारी अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दुग्ध व्यवसाय आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या पुण्यातील एका आघाडीच्या उद्योग समूहावर शोध आणि जप्ती मोहिमेत आयकर विभागाने 400 कोटी रुपयांहून अधिक अघोषित उत्पन्न उघड केले आहे.
25 नोव्हेंबर रोजी सहा शहरांमधील 30 परिसरांमध्ये टाकण्यात आलेल्या कर छापेमारीमुळे बेहिशेबी रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले, ज्याची एकूण किंमत 2.5 कोटी रुपये होती, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
शोध कारवाई दरम्यान, अनेक दोषी कागदपत्रे आणि करचुकवेगिरीचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. पुराव्याच्या प्राथमिक विश्लेषणात बोगस खरेदीचा दावा, बेहिशेबी रोख विक्री, रोख कर्जाचे व्यवहार आणि त्यांची परतफेड, अस्पष्ट रोख क्रेडिट इ. अशा विविध गैरप्रकारांचा अवलंब करून करपात्र उत्पन्नाची चोरी झाल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आले आहे.
पशुधनाची विक्री किंवा मृत्यू झाल्यामुळे झालेल्या नुकसानीचा चुकीचा दावा केल्याची उदाहरणेही निदर्शनास आली आहेत.
करपात्र उत्पन्नातून विशिष्ट वजावटीसाठी करनिर्धारण गटाने योग्य हिशोबाची पुस्तके ठेवली नाहीत हे उघड करणारे पुरावे देखील गोळा करण्यात आले आहेत अशी माहिती अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून देण्यात आली आहे.
पुढील तपास अद्याप सुरू आहे.