दिल्ली ते गल्ली भाजपच्या जाहिरातींमध्ये फोटोंचा फर्जीवाडा राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलखोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नोएडा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन केले. यावेळी या विमानतळाच्या मास्टर प्लानचे म्हणून चीनच्या बिजिंगमधील विमानतळाचे फोटो भाजपच्या नेत्यांनी वापरले. भाजपने विकासाच्या नावावर चीनमधील फोटो चोरल्याबाबचत खुद्द चीनमधूनही यावर टीका करण्यात आली.

ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी १२ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने युपीमधील विकासाच्या नावाने इंडियन एक्सप्रेस वर्तमानपत्रात छापलेल्या भल्या मोठ्या जाहिरातीमध्ये पश्चिम बंगालच्या कोलकातामधील ब्रिजचा फोटो छापण्यात आला होता. टीका झाल्यानंतर इंडियन एक्सप्रेसला याबद्दल माफी मागायला लावली.

आता देखील दिल्ली भाजपने झुग्गी सन्मान यात्रेच्या जाहीरातीसाठी सामान्य माणसाचा फोटो म्हणून तामिळचे प्रसिद्ध साहित्यिक, लेखक पेरुमल मुरुगन यांचा फोटो वापरुन त्यांना झोपडपट्टी रहिवासी दाखवलंय. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कृषी कायद्यांच्या जाहीरातीसाठी कृषी कायद्यांच्या विरोधातच आंदोलन करणारे शेतकरी हरप्रीत सिंह यांचा फोटो वापरला होता. महाराष्ट्रातही फडणवीस यांचे सरकार असताना मी लाभार्थी जाहीरातीसाठी शेतकऱ्यांचे त्यांच्या नकळत फोटो छापण्यात आले होते.

एकूणच जाहिरातींमध्ये विकासाची चोरी करून जनतेची दिशाभूल करण्याचे तंत्र भाजप राबवत आहे. विकास.. विकास.. अशी रट लावणाऱ्या भाजपचा विकास हा दुसऱ्या राज्यात किंवा इतर देशात जन्माला आलेला असतो, हे आता दिसून आलेय. दिल्ली ते गल्ली भाजपच्या जाहिरातींमध्ये होत असलेला फर्जीवाडा हा सोशल मीडियामुळे वारंवार समोर येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.