बलात्कारी, गुन्हेगारांना तिकीट देतात, मग मला का नाही? उत्पल पर्रीकरांचा फडणवीसांना सवाल!

बलात्कारी, गुन्हेगारांना तिकीट देतात, मग मला का नाही? उत्पल पर्रीकरांचा फडणवीसांना सवाल!

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर हे सध्या चर्चेत आहेत. विधानसभा निवडणुकीत पणजी मतदारसंघातून भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झालं आहे. पणजीच्या उमेदवारीवरून आत्ता उत्पल पर्रीकर आणि देवेंद्र फडणवीस असा नवा वाद रंगलाय. भाजपचे प्रमुख नेते अमित शहा यांनी उत्पल पर्रीकर यांची समजूत काढायचा प्रयत्न केला परंतु तरीही उत्पल पर्रीकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पणजीमध्ये भाजपकडून आमदार बाबुश मोन्सरात यांना तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे नाराज झालेले दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल परिकर यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे. पर्रीकर यांनी निवडणूक लढवू नये यासाठी भाजपकडून प्रयत्न केले गेले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पर्रीकर यांना दिल्लीमध्ये त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र उत्पल परिकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

भाजपचे गोवा राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उत्पल पर्रीकर हे फक्त मनोहर पर्रिकरांचा मुलगा आहे म्हणून पक्ष त्यांना तिकीट देणार नाही. उत्पल पर्रीकर यांनी पक्षासाठी काम करावे, त्यांची स्वतःची वेगळी ओळख नाहीये. पणजी विधानसभा मतदारसंघातून बाबुश मोन्सरात यांना भाजपकडून तिकीट देण्याचे निश्चित केले गेले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या उत्पल पर्रिकरांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले, “तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना तिकीट देऊ शकतात तर माझ्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला तिकीट का नाही देऊ शकत असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी फडणवीस यांना केला.

Leave A Reply

Your email address will not be published.