अभिनंदन..! भाजपच्या महिला नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचं अभिनंदन
अभिनंदन..! भाजपच्या महिला नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचं अभिनंदन
रोहीत तुझं खूप अभिनंदन कोणतं पद असो की नसो… आबांची नाळ जनतेशी कायम जोडलेली असायची. आबांच्या पावलांवर पाऊल टाकत तू हा जनसेवेचा वारसा पुढे सुरू ठेवला.. त्याचं फळ तुला आज मिळालंय. हे यश तुझं आहे. आज आबा असते तर त्यांना तुझा अभिमान वाटला असता.
हि पोस्ट आहे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांची. चित्रा वाघ यांनी दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत मिळवलेल्या विजया बद्दल युवा नेते रोहित पाटीलचे अभिनंदन केले आहे. भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस वर जोरदार टीका करणाऱ्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या युवा नेत्याचं केलेलं अभिनंदन सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. आज जाहीर झालेल्या निवडणूक निकालांवरून वाद प्रतिवादाच्या राजकारणाला फाटा देत चित्रा वाघ यांनी या निमित्ताने युवा नेत्याचं केलेलं अभिनंदन हि एक चांगली आणि सकारात्मक गोष्ट म्हणावी लागेल.
रोहीत तुझं खूप अभिनंदन…
कोणतं पद असो की नसो… आबांची नाळ जनतेशी कायम जोडलेली असायची. आबांच्या पावलांवर पाऊल टाकत तू हा जनसेवेचा वारसा पुढे सुरू ठेवला.. त्याचं फळ तुला आज मिळालंय.
हे यश तुझं आहे. आज आबा असते तर त्यांना तुझा अभिमान वाटला असता…@rohitrrpatilncp— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 19, 2022