रायगडच्या अपघातात जखमी झालेल्या भव्य पंडितने तोडला दम, आई, वडील बहीण संपूर्ण कुटुंब संपलं

महाराष्ट्रासाठी आजची पहाट ही वेदनादायी ठरली. मुंबई गोवा महामार्गावर ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या ९ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. एक लहान मुलगा जखमी झाला होता. त्याचंही नंतर निधन झालं आहे. या अपघातात हेदवी, सावंतवाडी आणि डावखोतमधील एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे. मूळचं डावखोतमधील आणि मुंबईत वास्तव्यास असलेलं पंडित कुटुंब संपूर्णपणे या अपघातात संपलं आहे. निलेश पंडित, मुद्रा पंडित, नंदिनी पंडित आणि भव्य पंडित यांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत कामानिमित्त असलेलं पंडित कुटुंब जाधव कुटुंबासोबत नातेवाईकाच्या वर्षश्राद्धासाठी गावी निघालं होतं. ते मुंबईहून गुहागरकडे इको गाडी नं. एमएच ४८ बीटी ८६७३ या गाडीतून निघाले होते. इको गाडीतून दहा जण प्रवास करत होते. मुंबई गोवा महामार्गावर माणगाव जवळील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेपोली गावाजवळ ट्रक आणि इको कारचा अपघात झाला. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात पंडित कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, भव्य पंडित हा जखमी झाला होता. मात्र, नंतर त्याचा देखील मृत्यू झाला.

मूळचे डावखोतमधील असणारे आणि मुंबईत मेडिकलमध्ये काम करणारे निलेश पंडित (४५), त्यांची पत्नी नंदिनी पंडित (३५) , त्यांची कन्या मुद्रा पंडित (१२) यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, अपघातात जखमी झालेल्या भव्य पंडितचा देखील नंतर मृत्यू झाला. या अपघातात डावखोतमधील संपूर्ण पंडित कुटुंबाचा अंत झाला.

पहाटे झालेल्या अपघातात पंडित कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. निलेश पंडित, नंदिनी पंडित आणि मुद्रा पंडित अशा तिघांचा मृत्यू झाला होता. जखमी असलेल्या भव्यनं आई वडील आणि बहिणीला गमावलं होतं. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र, चार वर्षाच्या भव्यची झुंज देखील अयशस्वी ठरली. उपचारादरम्यान त्याचा देखील मृत्यू झाला.

निलेश पंडित यांच्या पत्नी नंदिनी पंडित यांच्या आजीच्या वर्षश्राद्धासाठी जाधव पंडित कुटुंब मुंबईहून गावाकडे निघालं होतं. नंदिनी पंडित यांचं माहेर हेदवी होतं. नंदिनी या मूळच्या जाधव कुटुंबातील होत्या. आजीच्या वर्षश्राद्धासाठी निघालेल्या नंदिनी पंडित, त्यांचे पती निलेश पंडित, मुलगी मुद्रा आणि मुलगा भव्य या चौघांसह अपघातामध्ये एकूण १० जणांचा मृत्यू झाला.

अमोल रामचंद्र जाधव, दिनेश रघुनाथ जाधव,कांचन काशिनाथ शिर्के, अनिता संतोष सावंत, लाड मामा, निशांत जाधव, यातील दिनेश जाधव हे नंदिनी पंडित यांचा सख्खा भाऊ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.