सोलापूर जिल्ह्यात शैक्षणिक अधिकाऱ्यांच्या आणि केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांमुळे गंभीर परिणाम.
तातडीने उपायोजना करण्याची आमदार बबनदादा शिंदेंची मागणी
दिनांक: ३०/०७/२०२४
सोलापूर जिल्ह्यात शैक्षणिक अधिकाऱ्यांच्या आणि केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांमुळे गंभीर शैक्षणिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. माढा विधानसभा सदस्य बबनराव विठ्ठलराव शिंदे यांनी शालेय शिक्षण मंत्री श्री. दीपकजी केसरकर यांना लिहिलेल्या पत्रात या परिस्थितीची माहिती देत, तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
बबनराव शिंदे यांनी पत्रात असे नमूद केले आहे की, सोलापूर जिल्ह्यात मंजूर ११ पदांपैकी १० पदे सध्या रिक्त आहेत, ज्यामुळे शैक्षणिक व्यवस्थापन आणि कार्यक्षमत्यामध्ये मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. या प्रमुख शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. तसेच पत्रामध्ये प्रभावित तालुक्यांमधील शाळांचे प्रभावी निरीक्षण आणि मूल्यांकन होण्यास येत असलेला अडथळा, शैक्षणिक कार्यक्रम व धोरणांची अंमलबजावणी लांबणीवर, तसेच विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त प्रशासकीय भार पडत आहे ज्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे या मुद्दांना अधोरेखित करण्यात आहे.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी बबनराव शिंदे यांनी राज्य शासनाला तातडीने भरती प्रक्रिया सुरू करून या रिक्त पदांवर पात्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आवाहन केले आहे. या उपाययोजनांमुळे प्रशासकीय कार्यक्षमता सुधारण्यासह शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल.