जुन्नर तालुक्यातील १८ साकव पुलांच्या विकासकामांसाठी ७ कोटी ४० लक्ष रुपये मंजूर :- आ. अतुल बेनके यांची माहिती
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना ( सर्व साधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना) सन २१-२२ अंतर्गत जुन्नर तालुक्यातील १८ साकव पुलांच्या बांधकामासाठी ७ कोटी ४० लक्ष ३५ हजार रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
आमदार अतुल बेनके यांनी सांगितले कि, सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना साकव योजनेतून ओतुर येथील अमिरघाट रस्त्यावर साकव बांधणे ३१ लक्ष ६ हजार रुपये, धामणखेल निमगाव तर्फे म्हाळुंगे शिवेवरील ओढयावर साकव बांधणे ३० लक्ष ९४ हजार रुपये, साकोरी येथील साळवे विश्वासराव मळा ओढ्यावर साकव बांधणे ३१ लक्ष २ हजार रुपये, आलमे येथील स्मशानभूमीजवळ साकव बांधणे ३१ लक्ष २ हजार रुपये, खामुंडी ते सदादवस्ती रस्त्यावर ( सदाद ओढा) साकव बांधणे ३१ लक्ष ३ हजार रुपये, बोरी बु. येथे प्रजिमा -२१ ते सिद्धेश्वर मंदिर शिंदेमळा ठाकरवस्ती रस्त्यावर साकव बांधणे ५९ लक्ष ९८ हजार रुपये, बेल्हे येथील गंगाद्वार ओढ्यावर साकव बांधणे ३१ लक्ष २ हजार रुपये, औरंगपूर- भागडी मीना कालवा येथे साकव बांधकाम करणे ३० लक्ष ९५ हजार रुपये, निमगाव सावा येथे पारगाव तर्फे आळे शिवेच्या ओढ्यावर साकव बांधणे ४४ लक्ष ३२ हजार रुपये तर जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत भिवाडे खुर्द येथील रामजेवाडी ते भिवाडे बु अंतर्गत विरणकवाडी दरम्यान मीना नदीवर साकव बांधणे ५८ लक्ष १० हजार रुपये, आपटाळे येथील वाघमारे वस्ती ते देठेवस्ती दरम्यान साकव बांधणे ५९ लक्ष ९९ हजार रुपये, साकोरी येथील कांबळे-दलित वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यावर साकव बांधणे ५९ लक्ष ७६ हजार रुपये, बोरी खुर्द येथील गावठाण प्रजिमा २१ ते दुधवडे सोनवणेवस्ती दरम्यान साकव बांधणे ३९ लक्ष ८१ हजार रुपये, खामगाव येथील गावठाण मुख्य रस्त्यावर दलितवस्तीकडे जाणाऱ्या ओढ्यावर साकव बांधणे ६० लक्ष रुपये, कोल्हेवाडी क्र.१ जयराम भालेराव दलितवस्ती दरम्यान ओढ्यावर साकव बांधणे ३५ लक्ष रुपये, गोद्रे येथील भोजनेवाडी ते गायकवाड वस्ती – डावखरवाडी दरम्यान साकव बांधणे ३५ लक्ष रुपये, आळे येथील उकळीमळा- राजवाडा नवबौद्धवस्ती ओढ्यावर साकव बांधणे ३५ लक्ष रुपये आणि जिल्हा वार्षिक योजना आदिवासी उपयोजना अंतर्गत खैरे – खटकाळे या दोन गावांना जोडणाऱ्या ओढ्यावर साकव बांधणे ३५ लक्ष रुपये अशाप्रकारे या १८ साकव पुलाच्या कामांना ७ कोटी ४० लक्ष ३५ हजार रुपये मंजूर झाले आहेत.
जुन्नर तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर साकव पुलाच्या कामांसाठी निधी मंजूर झाला असून यातील काही कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामे सुरू आहेत तर काही कामांची निविदा प्रक्रिया सुरू असून सदर कामे लवकर सुरू होणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.