खासदार कोल्हेंनी एकांतवासाचं ‘अनमोल’ गुपित उलगडलं ….

खासदार कोल्हेंनी एकांतवासाचं ‘अनमोल’ गुपित उलगडलं, म्हणाले….

अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे काही दिवसांसाठी एकांतवासात जाणार आहेत. त्याबाबतची पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली असून त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. अखेर अमोल कोल्हे यांनी स्वतःच आपल्या एकांतवासाचं गुपित उलगडलंय.

.शिरूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करून लोकसभेत पोहोतलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आहेत. विधानसभा निवडणुकीत अमोल मिटकरी आणि अमोल कोल्हे यांनी प्रचाराची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर कोल्हे हे राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते होते…

कोल्हे हे अभिनेते असून त्यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. किंबहुना त्यांना या भूमिकांनी ओळख मिळवून दिली. सध्या कोल्हे हे खासदार असले तरी काही मालिका आणि जाहिरातींमध्ये काम करत होते.

शंभूराजे – शिवरायांच्या पात्रांमध्ये जीव ओतून रमणारे, आपल्या दमदार अभिनयाने खिळवून ठेवणारे, राजकारणात स्वतःचं वेगळं क्षेत्र निर्माण करणारे खासदार अमोल कोल्हे एकांतवासात गेल्यानंतर चर्चा होणारच. या एकांतवासाचा अनेकांनी आपापल्या वकुबानुसार किस पाडला. अनेकांनी ना-ना तर्कवितर्क लढवले. या साऱ्यांना स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट करत खासदार अमोल कोल्हे यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले की, आपण माझी काळजी केली. अनेक जण माझ्या एकातंवासाच्या पोस्टवर व्यक्त झाले. मला मात्र, यातून एक जाणीव झाली. ती म्हणजे आपल्या मानसिक आरोग्याच्या जाणिवेची गरज. तुमच्या-माझ्यासारख्या माणसाला येणारा आणि दुर्लक्षिला जाणारा मानसिक थकवा. ही मला सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटली. आपण अनेक दुर्दैवी बातम्या ऐकतो. वयाच्या तिशीच ह्रदविकारानं मृत्यू, पस्तीशित मधुमेह. अस्थमा, डोकेदुखी वगैरे…वगैरे. या साऱ्या आजाराचे मूळ आपल्या मानसिकतेत आहे, असे एक डॉक्टर म्हणून कोल्हे यांनी स्पष्ट केलं. त्यांनी पुरुषांच्या भावनांचा पटच या भावनिक आवाहनातून उलगडला. ते पुढे म्हणाले, आपल्याला पुरुषानं रडायचं नाही, त्यानं हळवं व्हायचं नाही हेच माहितंय. आपलं हळवेपण, भावना सार्वजनिक करायच्याच नाहीत. शिव्या देणं, कणखर असणं म्हणजेच पुरुष, असं शिकवलं गेलं. स्वप्न, आकांक्षा, गरजेच्या सीमारेषा पुसट झाल्या. आपण कशासाठी धावतोय, हेच विसरलो.

एकवेळ आपण धावताना थकतो. त्यावेळी शरीर थांबतं, पण मनाचं काय, असा सवाल त्यांनी यावेळी केला. त्याचं उत्तरही त्यांनी दिलं. ते पुढे म्हणाले, ग्रामीण भागातून शहरात येणारा प्रत्येक जण विभक्त कुटुंबात स्थिरावतो. त्याला मन कुठं मोकळं करायचं हेच समजतं नाही. त्याच्या आत खूप काही साचत जातं. यातूनच मधुमेह, ह्रदयविकार इतर आजार जडतात. त्यामुळं व्यक्त व्हा, मोकळे व्हा. हे होताना स्वतःला कमकुवत समजू नका. कणखरपणा वगैरे वगैरे ही सारी बेगडी विशेषणं आहेत, असं आवाहनही त्यांनी केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.