राज्यातील सगळ्या रुग्णवाहिकांची फिटनेस टेस्ट होणारं!

सत्यजीत तांबेंच्या मागणी नंतर परिवहन राज्यमंत्र्यांचे आदेश

कोविड संकटात महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या रुग्णवाहिका रुग्ण आणि आरोग्य विभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

अनेक वेळा या रुग्णवाहिका मधेच बंद पडतात आणि त्यामुळे रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचणे अवघड होते. त्यामुळे अत्यंत गरजेच्या व अत्यावश्यक असलेल्या राज्यातील सर्व रुग्णवाहिकांची फिटनेस तपासणी आरटीओ विभागाकडून करून घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सरकारकडे केली आहे. या मागणीला परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत.

परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांना दिलेल्या पत्रात सत्यजीत तांबे यांनी ही मागणी केली आहे. त्यांनी म्हटले, की रुग्णवाहिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तातडीच्या काळात यांचा उपयोग होत असतो.

 

एखादा गंभीर रुग्ण वेळेवर दवाखान्यात पोहोचणे हा त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न असतो. त्यामुळे रुग्णवाहिका सुस्थितीत असल्या तरच अशा रुग्णांचे जीव वाचेल. म्हणून त्या सर्वांची नियमित तपासणी करणे अत्यावश्यक आहे. कोरोना काळात या तपासणीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती; मात्र अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहीकांची तात्काळ तपासणी होणे गरजेचे आहे. अन्यथा सोलापूरसारखे अनेक ठिकाणी गंभीर प्रकार घडतील. यासाठी सरकारने खबरदारी घेऊन आरटीओ विभागाला तातडीने फिटनेस तपासणी करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. यावर मंत्री सतेज पाटील यांनी आरटीओ भागाला तात्काळ सूचना केली असून सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील सर्व रुग्णवाहिकांची आरटीओ विभागाकडून फिटनेस तपासणी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.