कृषिमंत्र्यांच्या बारामती दौऱ्यावर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया…
काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर सत्तार आता बारामती दौऱ्यावर येत आहेत. सत्तारांच्या या दौऱ्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “जे कोणी नेते बारामतीमध्ये येतात. त्या सर्व नेत्यांचे आम्ही स्वागतच केले आहे आणि त्यांचेही अर्थातच स्वागतच होईल. आमच्यावर अतिथी देवो भव असे संस्कार झाले आहेत. त्यामुळे जे येतील त्यांचे स्वागत असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड येथील विधानसभा सभेच्या पोट निवडणुकीची तारीख आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही निवडणुका पक्षातील वरीष्ठ नेते बैठक घेऊन लवकरच निर्णय जाहीर करणार असल्याचे सुप्रिया सुळेंनी सांगितले.
शिंदे-फडणवीस सरकारमुळे सर्वसामान्य भरडला जातोय.
मागील अनेक महिन्यापासून जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी शिंदे-फडणवीस सरकारकडे करीत आहोत. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी निवडणुका घेत नाही. त्यामुळे सर्व सामान्य नागरिक भरडला जात आहे. नगरसेवक नाहीत त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांनी प्रश्न कोणाकडे घेऊन जायचे. या गोष्टीच उत्तर सरकारने द्यावे, यावर हे सरकार भूमिका मांडणार नाही. असंही खासदार सुळे यांनी म्हटलंय.