‘बिग बॉस’ संपल्यावर अमृता धोंगडेनं घेतलं ज्योतिबाचं दर्शन; यळकोट यळकोट जय मल्हारचा केला जागर

बिग बॉस मराठीचं चौथं पर्व नुकतचं संपलं. दरवर्षीप्रमाणं बिग बॉसचं चौथं पर्वदेखील गाजलं ते यातील स्पर्धकांमधील भांडणांमुळे, वादावादीमुळे त्याचप्रमाणे एकमेकांबरोबरच्या मैत्रीमुळे आणि प्रेमामुळे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचं विजेतेपद अक्षय केळकर यानं पटकावलं असलं तरी सर्वच स्पर्धक कायमच चर्चेत होते. त्यातील सर्वाधिक चर्चा होती ती कोल्हापूरच्या झणझणीत मिरची असलेल्या अमृता धोंगडे हिची. अमृता बिग बॉसमध्ये अंतिम चार स्पर्धकांमध्ये दाखल झाली होती.

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा अक्षय जरी विजेता ठरला असला तरी इतर स्पर्धकांचीही जोरदार चर्चा होती. त्यात खास चर्चेत होती ती अमृता धोंगडे. अमृतानं झी मराठीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतून मनोरंजन विश्वात प्रवेश केला. त्यानंतर अमृता बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आली. बिग बॉस मराठीच्या घरातील अमृताचा ठसका, तिचा टास्कमधील खेळ हे सगळं प्रेक्षकांना खूप आवडलं होतं. त्यामुळेच बिग बॉस मराठी ४ संपल्यानंतरही अमृता अजूनही चर्चेत आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अमृता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या कायम संपर्कात आहे. अभिनेत्री सतत आपल्या विविध पोस्ट शेअर करत. चाहत्यांना तिच्या संदर्भातील अपडेट्स देत असते. अमृतानं नुकतीचं सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्री बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर आपल्या गावी कोल्हापूरला आणि तिथून ज्योतिबा दर्शनाला पोहोचली आहे. याबाबत अभिनेत्रीने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यावर सगळ्यात आधी कोल्हापूरला गेले घरी जंगी स्वागत झालं, कौतुक सोहळा झाला, आणि त्यानंतर थेट गेले ते ज्योतिबाला तुम्हा सर्वांच्या पाठिंब्यामुळे आणि ज्योतिबाच्या आशीर्वादामुळे बिग बॉस मराठी सिझन ४ ची फायनलिस्ट. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं.’

व्हिडिओमध्ये अमृतानं साडी नेसलेली दिसत आहे. तसंच नाकात नथ, कपाळावर गुलाल, हातामध्ये ज्योतिबाचा प्रसादाचा नारळ दिसत आहे. या व्हिडिओमधून चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल तिनं आभार मानले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.