घाटात घोडीवर बसायचं असेल तर लांडेवाडीला या… आढळरावांचं खा.कोल्हेंना आमंत्रण

मंचर | बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरून शिरूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राजकारण रंगलेले दिसत आहे. शर्यतीच्या मुद्द्यावरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol kolhe) हे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. घाटात बैलगाड्यासमोर घोडीवर बसायचं असेल तर लांडेवाडीला या, असे म्हणत आढळराव पाटील यांनी खा.कोल्हे यांना आमंत्रण दिले आहे. हे आमंत्रण डॉ. कोल्हे स्विकारणार का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

जुन्नर (Junnar) तालुक्यात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान बोलताना माजी खासदार आढळराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) डिसेंबर (२०२१) महिन्यात विविध अटी व शर्तीसह बैलगाडा शर्यतींना (Bullock Cart Race) परवानगी मिळाली आहे. आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी या आढळराव पाटील यांच्या गावी येत्या शुक्रवारी (ता.11) आणि शनिवारी (ता.12) या सलग दोन दिवस बैलगाडा शर्यती होणार आहेत. या शर्यतींच्या निमित्ताने दिलेल्या आमंत्रणाचा खासदार कोल्हे स्विकार करतील का? यावर खा.कोल्हे काय प्रतिक्रिया देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.