“आपके पास ‘भुजबल’ है और हमारे पास बुद्धीबल” छगन भुजबळांकडून जुन्या आठवणींना उजाळा

विधानभवनात प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आवर्जून उपस्थित राहत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समवेत हा चित्रपट पाहिला.

यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव, निर्माते विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली यांच्यासह विधिमंडळाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, शिवसेनेत असताना अटलजींसोबत चर्चा करण्याचा योग अनेकदा यायचा. एका बैठकीत अटलजींनी बाळासाहेबांना उद्देशून म्हटलेले वाक्य देखील आठवते. अटलजी म्हणाले होते “बालासाहब, आपके पास भुजबल है और हमारे पास बुद्धीबल है! दोनो का अगर मिलाप हो जाए, तो महाराष्ट्र में हम बदलाव लायेंगे!”

या चित्रपटाच्या माध्यमातून अटलबिहारी वाजपेयी यांचा जीवनप्रवास व संघर्ष मांडण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. मला खात्री आहे की, राजकारणात असणाऱ्या आणि राजकारणात येऊ पाहणाऱ्या अशा सर्वांसाठीच चित्रपट निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.