कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे १२ वी सायन्सला शिक्षण घेत असलेली श्रावणी निलेश देसाई या विद्यार्थिनीस स्विमिंगसह बेसबॉल स्पर्धेत मिळालेल्या दैदिप्यमान यशाबद्दल राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सन्मान केला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी श्रावणीस भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी देसाई कुटुंबातील सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
कु. श्रावणी निलेश देसाई हिने चेन्नई येथे झालेल्या ट्रायथलाॅन क्रीडा प्रकारात नॅशनल स्तरावर सहभाग घेत यश संपादन केले. कोल्हापूर येथे सागर पाटील जलतरण तलावात ५० मीटर फ्री स्टाइल व ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारात तृतीय क्रमांक, लोणावळा येथील ॲम्बी व्हॅली येथे झालेल्या खुल्या जलतरण स्पर्धेत दीड किलोमीटर प्रकारात सुवर्णपदक, नोव्हेंबर महिन्यात पालघर जिल्ह्यातील राजोडी समुद्र किनाऱ्यावर १ किलोमीटर सागरी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक तर १६ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे झालेल्या सागरी स्पर्धेत ५ किलोमीटर स्पर्धेत राज्यात ६ वा क्रमांक पटकावून पदक मिळवले.आता तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
तसेच नुकत्याच ७ जानेवारी रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथे ५ किलोमीटर समुद्रात स्पर्धा आयोजित करण्यात होती. ही स्पर्धा २ तास ४४ मिनिटात पूर्ण करत तिने यश संपादन केले असून बेसबॉल स्पर्धेत जिल्हास्तरीय, विभाग व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. त्याचबरोबर बेसबॉल या क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झालेले आहे.