मंचर ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यास नगरविकास विभागाची मंजुरी

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मंचर | पुणे जिल्ह्यातील मंचर ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यास नगरविकास विभागाची मंजुरी मिळाली आहे. राज्याचे गृहमंत्री आणि आंबेगाव मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हि घोषणा केली.

हा निर्णय घेण्यात यावा यासाठी नागरिकांनी वळसे पाटील आणि आढळराव पाटील या दोन्ही नेत्यांना अनेकदा निवेदनेही दिली आहेत. नागरिकांची मागणी आणि नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी सोयीचं व्हावं यासाठी राज्यसरकारने मंचर नगरपंचायत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंचरची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार एकवीस हजार 841 असून महापालिका अथवा वर्ग नगरपालिका पासून वीस किलोमीटरच्या आत मंचर ग्रामपंचायत येत नाही. तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 कलम 341 क मधील तरतुदीनुसार कृषी रोजगाराची टक्केवारी 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असणे गरजेचे असून मंचरच्या बाबतीत हे प्रमाण ५९.१५% असल्यामुळे सदर ग्रामपंचायतीचे नगरपंचायती मध्ये रुपांतर करण्याचे सर्व निकष पूर्ण होत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.