शशिकांत शिंदे पडला, याला शिवेंद्रराजेच जबाबदार – आ.शशिकांत शिंदे
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १००% राजकारण झालं - आ. शशिकांत शिंदे
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आ.शशिकांत शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत स्वपक्षीय नेत्यांसह आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली.
सातारा जिल्हा बँकेच्या संदर्भात जे आरोप प्रत्यारोप झाले ते माझ्यावर झालेले नाहीत. या निवडणुकीत गाफीलपणा नडला अशा आशयाच्या बातम्या दिल्या गेल्या. परंतु, निवडणुकीच्या संदर्भात चर्चा सुरु असताना काही जणांकडून हस्तक्षेप वाढल्याचं बोललं गेलं त्यावरही मी सविस्तर बोलणार आहे. सहकार पॅनेलचे इतर जे उमेदवारही पडले त्यासंदर्भात पॅनेल प्रमुखांनी खुलासा न केल्यानं मला भूमिका घ्यावी लागत आहे. पॅनेल प्रमुखांनी तो खुलासा करायला पाहिजे होता. आमचा पराभव झाल्यावर काहीजण नाचगाण्यात सहभागी झाले यामुळे या सगळ्याचा सुत्रधार कोण आहे हे ओळखावं, असं शशिकांत शिंदे यावेळी म्हणाले.
उदयनराजे भोसले यांच्यासंदर्भात रोज बातम्या छापून येत होत्या. मात्र, त्यांना बिनविरोध करण्यात आलं. जे पाच वर्ष प्रामाणिक राहिले त्यांना पराभतू करण्यात आलं. हे न समजण्या इतका दूधखुळा मी नाही, असंही शशिकांत शिंदे याप्रसंगी म्हणाले.
दरम्यान, माझ्या पराभवाला शिवेंद्रराजे भोसले हेच जबाबदार असल्याचा थेट आरोप आमदार शिंदे यांनी केला आहे.