परमबीर सिंह यांनी दहशतवाद्यांना केली मदत? सिंह यांच्यावर निवृत्त एसीपींकडून खळबळजनक आरोप

मुंबई | परमबीर सिंग यांच्याविरोधात आणखी एक लेटरबॉम्ब समोर आला आहे. ज्यामध्ये मुंबई पोलिसांचे निवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांनी परमबीर सिंग यांच्यावर 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडलेल्या एकमेव दहशतवादी अजमल कसाब याचा मोबाईल फोन लपवल्याचा आरोप केला आहे.

26/7/2021 रोजी मुंबई सीपींना लिहिलेल्या पत्रात, समशेर खान पठाण यांनी या प्रकरणाची चौकशी आणि कारवाई करण्याची मागणी केली आहे. पठाण यांनी पत्रात लिहिले आहे की, डीबी मार्ग पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पीआय माळी यांनी आपल्याला कसाबकडून एक मोबाईल फोन सापडल्याचे सांगितले होते, जो पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कांबळे यांच्याकडे ठेवण्यात आला होता.

त्यानंतर गिरगाव चौपाटीच्या सिग्नलवर कसाबला पकडले त्यावेळी परमबीर सिंगही तिथे उपस्थित होते. त्यानंतर परमबीर सिंग यांनी फोन सोबत ठेवला असता त्यांनी तो तपास अधिकारी रमेश महाले यांना द्यायला हवा होता, जेणेकरून तपासातील पाकिस्तानी हँडलर आणि त्यात कोणी भारतीय आहे का, हे कळू शकले असते.

मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा याच मोबाइलवरुन कसाबसह इतर दहशतवादी पाकिस्तानमधील हँडलरशी संवाद साधत होता. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पठाण यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.