एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर पंतप्रधान आणि अमित शहा यांच्याशी चर्चा करणार – नारायण राणे

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या एसटी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे. ते सिंधुदूर्गमध्ये माध्यमांशी बोलत होते.

यावेळी राणे म्हंटले की, महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत एसटी महामंडळाचा विषय येतो. बऱ्याच दिवसांपासून एसटीचा संप सुरू आहे. जवळपास ४० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या घरी भयावह परिस्थिती आहे. असं असताना राज्य सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. राज्य सरकार जर एसटी कर्मचाऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न गांभीर्याने घेत नसेल तर केंद्र सरकारने सरळ महाराष्ट्र सरकारला निर्देश देऊन या प्रकरणी राज्यपालांना अधिकार द्यावेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना प्रकरणी जो मार्ग काढायचा आहे, त्याबद्दल मी स्वतः अमित शहांशी आणि पंतप्रधानांशी चर्चा करेल असेही नारायण राणे यांनी म्हटले. वेळ पडल्यास राज्याच्या परिवहन मंत्र्यांसोबतही चर्चा करेल असेही राणे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.