पिंपरी चिंचवडमध्ये 5 डिसेंबर रोजी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
21 किमी, 10 किमी आणि 5 किमी अशा तीन प्रकारामध्ये होणार स्पर्धा
पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवडमध्ये 5 डिसेंबर रोजी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी अशा तीन प्रकारामध्ये होणार आहे.
किशान स्पोर्ट्स इंडिया प्रा.लि. यांच्या वतीने शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन आणि उन्नती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन (पीसीएचएम) स्पर्धेचे आयोजन केले आहे.
“उद्याच्या उज्वल भविष्यासाठी रस्ता सुरक्षा” हा संदेश देण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील हेही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आयर्नमॅन ट्रायथलॉन 29 वेळा पूर्ण केलेल्या कौस्तुभ राडकर यांची उपस्थिती या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
पीसीएमसी मॅरेथॉन मधील सहभागींना खालील गोष्टी मिळतील:
1. फिनिशर मेडल
2. टी-शर्ट
3. हेल्दी ब्रेकफास्ट
4. टायमिंग सर्टिफिकेट
5. गुडी बॅग
6. मोफत फोटो.
या स्पर्धेचे ठिकाण पिंपळे सौदागर असून येथून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
कोरोना संकटानंतर होणारी ही दुसरी स्पर्धा असल्याने स्पर्धकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
येथे नोंदणी करा:
https://www.townscript.com/e/pimpri-chinchwad-half-marathon-2021
अपडेट राहण्यासाठी PCHM ला फॉलो करा
Instagram:
https://instagram.com/pimprichinchwad_halfmarathon?r=nametag
Facebook:
https://www.facebook.com/Pimprichinchwadhalfmarathon/