अनिल देशमुख परत येतील, त्यांच्या त्रासाचा एक एक मिनिट वसूल करू!
शरद पवारांची गर्जना...
नागपूर | राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या बाबत वस्तुस्थिती मला माहित आहे. या प्रकरणात काय घडले ते त्यांनी मला सांगितलं होतं. ज्यांनी आरोप केले ते मात्र फरार आहे आणि देशमुख आतमध्ये आहेत, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर दौऱ्यावर असताना देशमुखांची आठवण काढली. अनिल देशमुख यांना जो त्रास दिला जातोय, मात्र त्यांचा त्रासाचा एक एक मिनिट वसूल करेल, ते पुन्हा सक्रिय होतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं.
शरद पवार चार दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना शरद पवार यांनी देशमुखांची आवर्जून आठवण काढली. शरद पवार यांनी आपल्या भाषणात अनिल देशमुख, एकनाथ खडसे, संजय राऊत, हसन मुश्रीफ, अजित पवार व त्याची बहीण या सर्व लोकांवर झालेल्या केंद्रीय संस्थेच्या कारवाईवर टीका केली.