मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग फरार घोषित, उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई | मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने परमबीर सिंग यांना फरार म्हणून घोषित करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अर्जाला परवानगी दिली आहे. गोरेगाव वसूली गुन्ह्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेने न्यायालयाकडे अर्ज केला होता. विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असलेले व गेल्या अनेक दिवसांपासून फरार असणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मुंबई उच्च न्यायालयानं फरार घोषित केलं आहे. परमबीर सिंह यांच्याबरोबरच रियाज भाटी आणि विनय सिंह यांनाही फरार घोषित करण्यात आलं आहे. अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी कोर्टाचे (एसप्लानेड) न्यायाधीश भाजीपाले यांनी हा निर्णय दिला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून परमबीर सिंग हे गायब आहेत. त्यामुळे परमबीर सिंग यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी होईल अशी शक्यता होती. पण त्याआधीच खंडणी प्रकरणात परमबीर सिंग यांना मुंबई किला कोर्टाने फरार घोषित केले आहे. गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्यांत फरार घोषित करण्यात आले आहे.
३० दिवसात परमबीर सिंग हे हजर न झाल्यास त्यांची संपती जप्त केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.