नवाब मलिकांच्या लढ्याला सरकारचं बळ, मुख्यमंत्री म्हणाले GOOD GOING

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना राज्य सरकारनं आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. राज्य मंत्रीमंडळानं मलिकांना जाहीर पाठिंबा देतानाच हा लढा सुरू ठेवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या लढ्याला मोठं राजकीय पाठबळ मिळाल्याचं मानलं जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचं मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर कौतुक केलं. Good Going नवाब मलिकजी, असं म्हणत त्यांनी आपला हा लढा सुरूच ठेवावा, असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरेंनी त्यांना केलं. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी मलिक यांचं कौतुकही केलं. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक विरुद्ध एनसीबी आणि त्यानंतर नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी लढाई महाराष्ट्रात रंगताना दिसत आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आऱोप-प्रत्यारोपाचा फैरी झाडल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळानं नवाब मलिक यांना जाहीर केलेला पाठिंबा ही मोठी राजकीय घडामोड ठरते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.