सत्यजीत तांबेंच्या ‘सुपर-60’ मुळे देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विजयाची पुनरावृत्ती
जितेश अंतापूरकरांच्या विजयात युवक काँग्रेसची भूमिका महत्वाची
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमधील पराभवानंतर त्यानंतरच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या काळात काँग्रेसमध्ये काहीशी मरगळ आली होती. लोकसभा निवडणुकांच्या पराभवामुळे काँग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्ते निराश व नाउमेद झाल्यासारखे वाटत होते.
अशा कठीण काळात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पुढाकार घेतला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी त्यांनी ‘सुपर-60’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला. २००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये थोड्याशा मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झालेले ६० मतदारसंघ त्यांनी या उपक्रमासाठी निवडले.
‘सुपर-60’ उपक्रमांतर्गत सत्यजीत तांबे यांनी या ६० मतदारसंघांमध्ये बूथ व्यवस्थापन, सोशल मीडिया व्यवस्थापन आणि प्रचार व्यवस्थापन या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करत उत्कृष्ट नियोजन केले.
या त्रिसूत्रीच्या वापरामुळे पक्षातील निराश कार्यकर्त्यांना हुरूप आला व नव्या उमेदीने सर्वजण कामाला लागले. सत्यजीत तांबे यांचे उत्तम मार्गदर्शन व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मेहनत यांचा एकत्रित परिणाम म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या ६० मतदारसंघात उभे असलेले काँग्रेसचे २८ उमेदवार निवडून आले. या ‘सुपर-60’ मध्ये देगलूर बिलोली हा विधानसभा मतदारसंघ देखील होता. त्या विजयी २८ आमदारांमध्ये स्व.रावसाहेब अंतापूरकरही होते. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर झालेल्या देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांच्या रुपाने पुन्हा काँग्रेसने विजय मिळविला आहे.
जितेश हे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस असल्याने सत्यजीत तांबे यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेससाठी या विजयाचे वेगळे महत्त्व आहे. सत्यजीत तांबेंच्या ‘सुपर-60’ उपक्रमामुळे एकाच मतदारसंघात काँग्रेसने विजयाची पुनरावृत्ती साधली आहे.
सत्यजीत तांबे यांनी ‘सुपर-60’ ही संकल्पना काँग्रेससाठी राज्यात लाभदायक ठरलेली आहे. आता सत्यजीत तांबे यांनी Super 1000 हा उपक्रम हाती घेतलाय! या उपक्रमाच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत युवकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. Super 60 प्रमाणे सत्यजीत तांबे यांचा Super 1000 हा अभिनव उपक्रम काँग्रेसला राज्यात पुन्हा गतवैभव मिळवून देईल, यात शंकाच नाही.