चौकशीत सहकार्य करत असतानाही अनिल देशमुखांना अटक होणं दुर्दैवी – रोहित पवार
मुंबई | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर 13 तासाच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केली आहे. काल दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अनिल देशमुख हे अखेर ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. यानंतर संध्याकाळी आठ वाजताच्या दरम्यान ईडीचे जॉईंट डायरेक्टर सत्यव्रत कुमार हे दिल्लीवरून थेट ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यांनी देखील अनिल देशमुख यांची चार तास चौकशी केली आणि अखेर रात्री 1 वाजताच्या दरम्यान देशमुख यांना ईडीने अटक केली. याची माहिती रात्री सत्यव्रत कुमार यांनी दिली.
यावर प्रतिक्रिया देता असताना आ. रोहित पवार यांनी अनिल देशमुख चौकशीत सहकार्य करत असताना त्यांना अटक होणं दुर्दैवी आहे असं म्हटलं आहे. आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीचा शोध घ्यावा. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग बेपत्ता आहेत, ते जर परदेशात गेले असतील तर त्यांना कुणाची साथ आहे? असा सवालही रोहित पवार यांनी यावेळी विचारला. गेल्या अनेक काळापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना दाबण्यासाठी होतोय. हे आपण पाहिलं आहे. एखादा व्यक्ती चौकशी यंत्रणांना सहकार्य करत करताना देखील अटकेची कारवाई करणं, हे योग्य नाही, असं रोहित पवार म्हणाले.