मलिकांच्या टि्वटनंतर ‘मुंबई रिव्हर अँथम’मधून जयदीप राणाचे नाव काढले?
जयदीप राणा ड्रग्स प्रकरणा संबंधित आरोपी
मुंबई | राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषद देऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप केले.
अमृता फडणवीस यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘मुंबई रिव्हर अँथम’ या व्हिडिओला फायनान्स हा जयदीप राणा या व्यक्तीने पुरवला होता. यात नदी स्वच्छता मोहिमेवर अमृता फडणवीस यांनी हे गाणं तयार केलं होते. या गाण्याचा फायनान्स हेड हा जयदीप राणा असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितलं होते. मलिक यांनी या बाबतच्या युट्युब व्हिडीओच्या खालील माहितीचा स्क्रिनशॉट टि्वट करीत याचा पुरावा दिला होता.
मलिक यांच्या या गंभीर आरोपानंतर आता युट्यूबवर आपण ‘मुंबई रिव्हर अँथम’ हा व्हिडिओ पाहिला तर आपल्याला व्हिडिओच्या श्रेयनामावलीमध्ये जयदीप राणा यांचे नाव काढून टाकल्याचे दिसते. कारण सकाळी मलिक यांनी जे टि्वट केलं आहे. यात जयदीप राणाचं नाव होतं, हे नाव अचानक का गायब झाले? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
Details of 'River Song' which shows Jaydeep Rana as Finance Head.
Song sung by Ms. Amruta Fadnavis
Video shows Devendra Fadnavis and Sudhir Mungatiwar as actorshttps://t.co/LddkleoTaQ pic.twitter.com/lWnq2d4wF6— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021