औंध–बोपोडीत लोकसहभागातून विकासाचा नवा अध्याय
सनी विनायक निम्हण यांचे “Solve With Sunny” अभियान सुरू
श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी, भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी तसेच महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील विकासासाठी लोकसहभागावर आधारित अभिनव उपक्रम “Solve With Sunny” ची सुरुवात भाजपा नेते सनी विनायक निम्हण यांनी केली आहे.
हा उपक्रम Policy, Planning आणि Public Participation (P3) या आधुनिक व प्रभावी संकल्पनेवर आधारित असून, प्रभागातील नागरिकांच्या समस्या, सूचना आणि विकासविषयक कल्पना थेट लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी हा जाहीरनामा लोकांच्या सहभागातून साकार केला जाणार आहे.
या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना QR कोड स्कॅन करून Google Form द्वारे, सोशल मीडियावरून, WhatsApp व ई-मेलद्वारे तसेच प्रभागातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या सूचना नोंदणी कक्षांमधून आपली मते मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लोकांच्या प्रश्नांना थेट ऐकून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचा हा पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रयत्न नागरिकांमध्ये विशेष कौतुकाचा विषय ठरत आहे. “जनतेसोबत, जनतेसाठी आणि जनतेद्वारे विकास” ही भूमिका साकार करणारा Solve With Sunny हा उपक्रम औंध–बोपोडीच्या सर्वांगीण विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.