औंध–बोपोडीत सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून आनंदाचा, उत्साहाचा सोहळा रंगला
औंध–बोपोडी भागातील माता-भगिनींसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे यशस्वी आयोजन सामाजिक कार्यकर्ते सनी निम्हण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यासोबतच ४ ते १४ वर्ष वयोगटातील लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या “सेल्फी विथ बाप्पा” या अभिनव उपक्रमाला औंध–बोपोडी परिसरातून उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
या दोन्ही उपक्रमांचा बक्षीस वितरण समारंभ इंदिरा गांधी प्राथमिक शाळा मैदान, औंध येथे मोठ्या उत्साहात पार पडला. स्पर्धेत सहभागी झालेल्या माता-भगिनी, बाल मित्र-मैत्रिणी यांच्या उपस्थितीने संपूर्ण मैदान फुलून गेले होते. उपस्थित सर्वांसाठी सुप्रसिद्ध सूत्रसंचालक श्री. संदीप पाठक यांच्या “खेळ रंगला पैठणीचा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला.
या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य लकी ड्रॉ स्पर्धेमधून अनेक माता-भगिनींना आकर्षक बक्षिसांचा लाभ मिळाला. संपूर्ण कार्यक्रमात आनंद, उत्साह आणि समाधानाचे वातावरण दिसून आले.
या यशस्वी आयोजनामागे भाजप नेते सनी निम्हण यांचा सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन, नियोजनबद्ध कामकाज आणि औंध–बोपोडी भागातील महिलांसाठी काहीतरी वेगळे करण्याची तळमळ ठळकपणे जाणवली. याप्रसंगी त्यांनी उपस्थित सर्व माता-भगिनींचे मनापासून आभार मानत, आजपर्यंत मिळालेल्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि हा आशीर्वाद पुढेही कायम राहावा अशी भावना व्यक्त केली.
औंध–बोपोडी परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांना चालना देणारे सनी विनायक निम्हण यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे.