कर्जत जामखेडकरांची अवस्था म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं, सांगताही येईना, बोलताही येईना

राम शिंदेंची रोहित पवारांवर टिका

 

कर्जत | कर्जत जामखेडकरांची अवस्था म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं झालंय. कुणाला सांगताही येईना, बोलताही येईना, अशा शेलक्या शब्दात माजी मंत्री भाजप नेते राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांवर टीका केलीय. जामखेडमधील एका कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांच्या कार्यशैलीवर बोलताना त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. ग्रामीण शब्दातून आणि फटकेबाजीतून त्यांनी रोहित पवारांवर टीकेचे बाण सोडले.

सगळ्यांचे चेहरे बघतोय, सगळ्यांना कसं बरं वाटतयं, मोक्कारच बरं वाटतयं, आता सांगता येईना अन बोलता येईना, निव्वळ अवघड जाग्यावरचं दुखणं झालंय, अशी फटकेबाजी राम शिंदे यांनी केलीय. शेजारच्या गड्याला काम दाखवलं, कशी जिरवली म्हणता, माझी तर जिरलीच, पण आता जेव्हा मी बाहेर आलो, तेव्हा सगळी माणसं म्हणतात, आमचीही जिरली साहेब आता, अशी टोलेबाजी शिंदेंनी. या कार्यक्रमाला खासदार सुजय विखे पाटील देखील उपस्थित होतेय.

रोहित पवार बारामतीचे असूनही कर्जत जामखेडमधून लढले आणि कर्जत-जामखेडकरांच्या आशीर्वादाने आमदार झाले. बाहेरुन येऊनही रोहित पवारांनी राम शिंदेंना हरवलं. याचं शल्य राम शिंदेंच्या मनात अजूनही जाणवतं. अधून मधून एखाद्या जाहीर कार्यक्रमांतून ते आपली खंत बोलून दाखवत असतात. जामखेडच्या एका कार्यक्रमात त्यांनी खंत बोलून दाखवताना जोरदार फटकेबाजी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.